बिग बी एक रुपयाच्या शोधात!

8

सामना ऑनलाईन । मुंबई

डिजिटायझेशनचा महत्त्वाचा चौथा टप्पा सुरू होत असतानाच टाटा स्काय या भारताच्या पे टीव्ही आणि ओटीटी सेवा देणाऱ्या आघाडीच्या कंटेट वितरण माध्यमाने नुकतेच ‘धमाका रूपी’ अभियान लाँच केले आहे. देशभर चालणार असलेल्या या अभियानात अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे. हे अभियान राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शूजित सरकार यांनी केले असून त्यात लिजेंडरी अमिताभ बच्चन कंटाळवाण्या तरीही प्रेमळ दुकानदाराची- अंकलजीची भूमिका करत आहेत, ज्यांचं आयुष्य धमाका १९९ पॅकमूळे आमूलाग्र बदलून जातं. वेगाने विकणारा हा पॅक त्यांना ग्राहकांना देण्यासाठी सुट्या एक रुपयाचा साठा जमवण्यासाठी भाग पाडतो. दरम्यान, दक्षिण भारतातल्या एका छोट्या खेड्यात सुपरस्टार नयनतारा यांनी साकारलेली मीनाक्षीही एक रुपयाच्या नाण्यांच्या शोधाने कंटाळलेली असते, कारण टाटा स्कायच्या साउथ स्पेशल पॅकचं यश त्या अनुभवत असतात.

मलय दीक्षित, टाटा स्कायचे प्रमुख कम्युनिकेशन्स अधिकारी म्हणाले, ‘आपण जे खरेदी करतो त्याचं नेमकं मूल्य चुकतं करण्याची भारतीयांची जुनी सवय आहे. या अभियानातले सोपे आणि विनोदी संवाद याच सवयीची थट्टा करत, फक्त काही सेकंदांमध्ये पॅकचे तपशील, त्याची किंमत आणि त्यातून मिळणारे पैशांचे मूल्य यांची माहिती देते. या अभियानाद्वारे आम्ही देशभरातील ७० एमएन केबल टीव्ही घरांना लक्ष्य करत आहोत.’

सुकेश नायक, ऑग्लिव्ही अँड मॅथर्सचे प्रमुख क्रिएटीव्हीटी अधिकारी, ऑग्लिव्ही पश्चिम (भारत) म्हणाले, ‘टाटा स्कायचा सर्वात लोकप्रिय आणि ९९ रुपयांचे अतिशय स्पर्धात्मक मूल्य असलेला पॅक विकण्यासाठी आम्ही दुकानदारांना नेहमी तोंड द्याव्या लागणाऱ्या परिस्थितीचे म्हणजेच असा पॅक विकण्यासाठी जमा कराव्या लागणाऱ्या त्याला सुट्ट्या पैशांची तजवीज करावी लागते तेव्हा काय होतं याची गमतीशीर बाजू दाखवली आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या