बल्गेरियात बिग बींनी सेटवर सर्वांना दिला वडा पाव

सामना ऑनलाईन । सोफिया

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे सध्या त्यांच्या बिग बजेट ब्रम्हास्त्र या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहेत. या चित्रपटाचे शूटींग वेगेवेगळ्या देशांमध्ये होणार असून सध्या ब्रम्हास्त्रची सर्व टीम बल्गेरियामध्ये शूटींग करत आहे. या सगळ्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून बिग बींनी त्यांच्या ब्रम्हास्त्रच्या सेटवर सर्वांना पार्टी दिली आहे. या पार्टीमध्ये चक्क त्यांनी सर्वांना मुंबईच्या खाद्यसंस्कृतीची ओळख असलेला वडापाव आणि समोसा खाऊ घातला.

बिग बींनी ट्विटवर वरून त्यांच्या या वडापाव पार्टीची माहीती दिली. ‘बल्गेरियातील सोफियामध्ये ब्रम्हास्त्रच्या संपूर्ण टीमला वडापाव आणि समोसा खाऊ घातला. माझ्या साठी ही फार मोठी कामगिरी आहे’, असे ट्विट बिग बींनी केले आहे.

बाहुबली सारखाच ब्रम्हास्त्र हा देखील बिग बजेट चित्रपट असून हा चित्रपट देखील दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाचे शूटींग सुरू झाले असून हा भाग पुढच्या वर्षी १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत रणबीर कपूर आणि आलिया भट हे दोघेही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.