लॉकडाऊनमध्य़े अडकलेला अमिताभ बच्चन यांचा चित्रपट अॅमेझॉनवर होणार प्रदर्शित, रिलीज डेट जाहीर

1188

अमिताभ बच्चन व आयुषमान खुराण यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट गुलाबो सिताबो हा एप्रिल महिन्यात रिलीज होणार होता. मात्र कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण देशात 24 मार्चपासून लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक तयार चित्रपट रिलीजसाठी रखडले आहेत.

अमिताभ बच्चन व आयुषमान खुराना यांचा बहुप्रतिक्षित गुलाबो सिताबो चित्रपटाची देखील एप्रिल महिन्यात रिलीज डेट होती. मात्र लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या या चित्रपटाला दिग्दर्शक सुजित सरकारने व निर्मात्यांनी अॅमेझॉन प्राईमवर रिलीज करण्याचे ठरवले आहे. हा चित्रपट 12 जूनला रिलीज होणार आहे. आज या चित्रपटाचे पोस्टर देखील रिलीज करण्यात आले आहे. आयुषमान खुराणा व अमिताभ बच्चन या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. लॉकडाऊनमुळे एखाद्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणारा गुलाबो सिताबो हा पहिला चित्रपट ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या