चाहत्यांकडून आता पूर्वीसारखे प्रेम मिळत नाही! बिग बी यांनी व्यक्त केली खंत

महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यातील अनुभव ते आपल्या चाहत्यांसोबत शेयर करत असतात. नुकताच त्यांनी एक थ्रोबॅक पह्टो शेयर करत चाहत्यांमध्ये कशा प्रकारे बदल झाला याबाबत सांगितले आहे. बिग बी यांनी शेयर केलेल्या फोटोमध्ये ते एका छोटय़ा चाहतीला ऑटोग्राफ देताना दिसत आहेत. त्यांच्या बाजूला अभिनेते शशी कपूर दिसत आहेत. हा फोटो शेअर करत त्यांनी म्हटलंय, ‘‘आता ते दिवस गेले जेव्हा चाहते मला अशा प्रकारे प्रेम आणि आदर करायचे. या मुलीकडे बघा. आभारी असल्याचे व्यक्त करत आहे. तिच्या चेहऱयावर असणारे हावभाव बघा. आता फक्त इमोजी शिल्लक राहिले आहेत. जर तुम्ही भाग्यवान असाल तर!’’ त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांपासून सेलिब्रिटी कमेंट करत त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. त्यांचा हा पह्टो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या