कोहलीविरूद्ध गरळ ओकणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांची बिग-बींनी तोंडे बंद करून टाकली

32
बीग बी अमिताभ बच्चन यांना भेंडीची भाजी खायला खूप आवडते.

सामना ऑनलाईन,मुंबई

धमाकेदार फलंदाज आणि हिंदुस्थानी संघाचा कर्णधार याच्याविरूद्ध ऑस्ट्रेलियाची प्रसारमाध्यमे जबरदस्त गरळ ओकतायत. ऑस्ट्रेलियाचा संघ संध्या हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आहे. कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकल्यानंतर हिंदुस्थानी संघाने जबरदस्त कमबॅक करत दुसरा सामना जिंकला तर तिसरा सामना अनिर्णित राहीला. ऑस्ट्रेलियाच्या संघाला फारसं यश मिळत नसल्याने ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांनी विराट कोहलीवर टीका करत त्याला हिणवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विराटला क्रीडा क्षेत्रातील ट्रम्प असं नाव ठेवलं. ही टीका बिग-बी अमिताभ बच्चन यांच्या निदर्शनास आली. यानंतर त्यांनी एक ट्विट केलं की ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांची तोंडेच बंद झाली आहे

अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केलं ज्यात त्यांनी लिहलं की ऑस्ट्रेलियाची माध्यमं विराट कोहलीला ट्रम्प म्हणतायत, विराटला विजेता आणि सर्वश्रेष्ठ मानल्याबद्दल धन्यवाद. ऑस्ट्रेलियातील दैनिक द डेली टेलिग्राफने कोहलीला ट्रम्प म्हणत टीका केली होती की ट्रम्प यांच्याप्रमाणे कोहलीने सगळ्या गोष्टींचे खापर माध्यमांवर फोडायला सुरूवात केली आहे. याला लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनी ताबडतोब उत्तर दिलं होतं. गावस्कर म्हणाले की ऑस्ट्रेलियाची प्रसारमाध्यमे ही ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचा सपोर्टींग स्टाफ म्हणजेच मदतनीस आहेत, आणि त्यांना फार गांभीर्याने घेऊ नये.

 

आपली प्रतिक्रिया द्या