शिवरायांच्या एकेरी उल्लेखाप्रकरणी बिग बी यांचा माफीनामा

2502

कौन बनेगा करोडपती या सोनी वाहिनीवरील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करण्यात आला होता. त्यावरून शिवभक्तांनी नाराजी दर्शवली होती. सोनी वाहिनीने नंतर दिलगिरी व्यक्त केली. परंतु सोनी वाहिनीने माफी मागावी अशी मागणी शिवभक्तांनी केली होती. या प्रकरणी शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांनी माफी मागितली आहे.

शोचे निर्माते सिद्धार्थ बसू आणि बिग बीं यांनी ट्विटरवर माफी मागिती आहे. बसू यांनी एक सुधारित फोटो टाकला आहे. ज्यात शिवरायांच्या उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज असा केला आहे. तसेच या मागे शिवरायांचा अपमान करण्याचा कुठलाच हेतू नव्हत असे बसू यांनी म्हटले आहे. केबीसीच्या या पर्वात सर्व व्यक्तींची पूर्ण नावे देण्यात आली आहे. शिवरायांचा एकेरी उल्लेख चुकून झाल्या त्यासाठी माफी द्यावी असे बसु यांनी म्हटले आहे. अमिताभ बच्चन यांनी बसु यांचे ट्विट रीट्विट करून शिवरायांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता त्यासाठी जाहीर माफी असे बिगबींनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या