लवकरच थाटात परतेन…शहेनशाह बिग बी यांची पोस्ट व्हायरल

महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बिग बी लवकरत रॅम्पवर परतणार आहेत. प्रोडक्ट के सिनेमाच्या शुटींग दरम्यान झालेल्या अपघातामुळे ते बेड रेस्टवर होते. मात्र आता त्यांनी आपल्या चाहत्यांना त्यांची हेल्थ अपडेट दिली आहे. लवकरच ते कामावर परतणार आहेत. अशी पोस्ट शेअर केल्याने चाहते प्रचंड खुश झाले आहेत.

बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन गेल्या अनेक दिवसांपासून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती घेत आहेत. घरात बसल्या बसल्या अमिताब बच्चन बऱ्याच गोष्टी मिस करत आहेत. हे त्यांच्या पोस्ट पाहिल्यावर लक्षात येतील. आज अमिताभ यांनी सोशल मीडियावर सकाळीच दोन पोस्ट शेअर केल्या. पहिल्या पोस्टमध्ये अमिताभ यांनी एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोत ते रॅम्पवॉक करताना दिसत आहेत. यामध्ये त्यांनी काळ्या रंगाचा स्टायलिश कुर्ता पायजमा घातला आहे. हा फोटो शेअर करत अमिताभ बच्चन यांनी एक फोटोओळ दिली आहे. त्यात लिहीलेय, मी बरा होण्यासाठी सर्वांनी केलेले प्रेम आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद. मी आता बरा होत आहे. लवकरच थाटात परतेन अशी पोस्ट केली आहे. अमिताभ बच्चन यांची हेल्थ अपडेट मिळाल्याने चाहते खूश झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

तर दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय दिसत आहेत. तर त्यावेळी अमिताभ पोडियमजवळ उभे राहून एक जुना किस्सा सांगताना दिसत आहेत. हा कोणत्यातरी अवॉर्ड फंक्शनमधील व्हिडीओ आहे. यामध्ये शाहरूख खानही दिसत आहे. बिग बींच्या या जुन्या किस्स्यावरुन प्रत्येकजण खूप हसत आहे. त्यांच्या या व्हिडीओला प्रचंड लाईक केले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी सिनेमा ‘प्रोडक्ट के’ च्या शुटींगच्यावेळी ते अॅक्शन सीन शूट करत होते. त्याचवेळी त्यांची बरगडी तुटली. हैदराबाद येथे शुटींग दरम्यान हा अपघात झाला होता. त्यावेळी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन त्यांना मुंबईला रेफर करण्यात आले होते.