बिग बी अपघातातून थोडक्यात वाचले

जगात डावखुर्‍यांची संख्या ही १०% आहे.

सामना ऑनलाईन । कोलकाता

पश्चिम बंगाल सरकारने आमंत्रित केल्यामुळे २३व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उपस्थित राहिलेले हिंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशहा अमिताभ बच्चन कार अपघातातून थोडक्यात वाचले.

कोलकातामध्ये अमिताभ यांच्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने एका खासगी ट्रॅव्हल कंपनीकडून मर्सिडिझ कार भाड्याने घेतली होती. याच कारमधून अमिताभ प्रवास करत होते. शनिवारी कार्यक्रम झाल्यानंतर सकाळी विमानतळावर जाण्यासाठी अमिताभ मर्सिडिझमधून निघाले. कार डुफ्फेरिन रोडवर असताना गाडीचे मागच्या बाजूचे एक चाक निघाले आणि अपघात झाला. या अपघातातून अमिताभ वाचले. पश्चिम बंगाल सरकारने अपघात प्रकरणी ट्रॅव्हल कंपनीला नोटीस बजावली आहे. अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, अमिताभ बच्चन सुखरुप असून सध्या मुंबईत त्यांच्या घरी असल्याचे पश्चिम बंगाल सरकारच्यावतीने सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या