बिग बी यांचा मेट्रोला पाठिंबा

258

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी सोमवारी ट्विट केले असून मेट्रो सेवेचे कौतुक केले आहे. मेट्रो सेवा किती कार्यक्षम आणि सोयिस्कर आहे हे सांगण्यासाठी त्यांनी आपल्या मित्राचे उदाहरण दिले आहे. ‘मेडिकल एमर्जन्सीच्या वेळी माझ्या मित्राने त्याच्या कारऐवजी मेट्रोचा पर्याय निवडला. त्याने परतल्यानंतर मेट्रो सुविधा ही खूप सोयिस्कर आणि खासगी वाहनांपेक्षा अधिक कार्यक्षम असल्याचे सांगितले’, असे बिग बी यांनी ट्विट केले आहे. अधिकाधिक झाडे लावणे हाच प्रदूषणावर उपाय आहे. मी माझ्या बागेत खूप झाडे लावली आहेत. तुम्ही हे केलंत का? असा सवालही त्यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या