अमिताभ बच्चन यांनी फेडले बिहारातील 2100 शेतकऱ्यांचे कर्ज

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी बिहार राज्यातील 2100 शेतकऱ्यांचे कर्ज फेडून त्यांना कर्जमुक्त केले आहे. अमिताभ यांनी याबाबत आपल्या ब्लॉगवर माहिती दिली आहे. आपल्या ‘जनक’ या निवासस्थानी बिहारातील काही शेतकऱ्यांना बोलावले. या शेतकऱ्यांना कर्जफेडीसाठी श्वेता आणि अभिषेक बच्चन यांच्या हस्ते पैशांची देणगी देण्यात आली.

बिहारातील अनेक कर्जबाजारी शेतकऱ्यांपैकी 2100 शेतकऱ्यांना निवडून त्यांच्या कर्जाची रक्कम बँकेत ओटीएसद्वारे भरली आहे. त्यांपैकी काही शेतकऱ्यांना ‘जनक’ या निवासस्थानी बोलावले. बिहारातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करताना अमिताभ यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. आता आम्ही दुसरे आश्वासन पूर्ण करणार आहोत. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करणार आहोत, असे बच्चन यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या