बिग बींनी शेअर केला तीन पिढ्यांचा पगडीतील दुर्मिळ फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडचे सुपरस्टार बिग बी अमिताभ बच्चन यांनी आजोबांचा पगडीतील एक दुर्मिळ फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये बिग बींचे आजोबा नाना दारजी सरदार खजान सिंह सूरी, स्वत: अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन पगडीमध्ये दिसत आहे. या फोटोला बिंग बींनी, माझे आजोबा… नाना दारजी सरदार खजान सिंह सूरी आणि माझ्या मुलासोबत, असे कॅप्शन दिले आहे.

अमिताभ बच्चन सध्या आपला आगामी चित्रपट ‘चेहरे’ आणि ‘गुलाबो सिताबो’च्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहेत. ‘चेहरे’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान 14 मिनिटांचा संवाद वन टेक दिल्याने बिग बींची चर्चा सुरू आहे आणि त्यांचे कौतुकही सुरू आहे. तसेच त्यांनी ‘गुलाबो सिताबो’मधील एक वेगळ्याच लूकमधील फोटो शेअऱ केला होता. आता त्यांनी तीन पिढ्यांचा फोटो एकत्र शेअर केला आहे.