
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकताच कौन बनेगा करोडपती या सुपरहिट शो चा अखेरचा एपिसोड शूट केला. बिग बी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली.
बिग बी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये नमूद केले की, ‘मी आता थकलो आहे आणि रिटायर झालोय… मी तुमच्या सर्वांची माफी मागतोय… कौन बनेगा करोडपतीच्या चित्रिकरणाचा अखेरचा दिवस खूपच लांबला… कदाचित उद्या सुधारणा होईल… परंतु हे लक्षात ठेवा की काम तर काम असते आणि ते तन्मयतेने करायला हवे.’ बिग बी यांच्या या पोस्टवरून ते कौन बनेगा करोडपतीच्या पुढील सिझनमध्ये दिसण्याची शक्यता कमीच आहे.
दरम्यान, अखेरच्या एपिसोडच्या चित्रिकरणाबाबतही त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये नमूद केले आहे. चित्रिकरणादरम्यान सर्वांच्या प्रेमळ वागण्याबद्दल बिग बी यांनी आभार मानले आहेत. तसेच या सर्व गोष्टी आपापसात कुठे ना कुठे तरी जोडलेल्या आहेत, असेही ते म्हणाले. तसेच कधी थांबायचे नाही, सतत चालत रहायचे हीच इच्छा आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे. यावेळी त्यांनी शोच्या क्रू मेंबर आणि सर्व टीमचे आभारही मानले.