अम्फन चक्रीवादळ येतेय; या सहा राज्यात ऑरेंज अलर्ट जारी

3117

देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले असतानाच आता देशाच्या पूर्व किनारपट्टीपासून ते उत्तर हिंदुस्थानापर्यंतच्या राज्यांना अम्फन चक्रीवादळाचा तडाखा बसणार आहे. आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोरम आणि मणिपूर या राज्यांना ऑरेंज अर्लट जारी केला केला

हवामान खात्याच्या अंदाजानुसार दक्षिण पूर्व बंगालच्या खाडीत कमी दाबाच्या हवेच्या पट्टा निर्माण झाला असून त्याचे वादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. आज रात्रीपर्यंत या वादळाचे रुपांतर चक्री वादळात होऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात असून ओडिशाच्या अनेक भागांत तसेच आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोरम आणि मणिपूर या राज्यांना ऑरेंज अर्लट जारी केला आहे. याशिवाय पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये देखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या