अमरावती शिक्षक मतदारसंघ- भाजपच्या धांडेंचे भांडे रिकामेच

अमरावती शिक्षक मतदारसंघात अपक्ष किरण सरनाईक यांनी बाजी मारली. शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे आणि भाजपचे नितीन धांडे यांचा पराभव झाला. साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करून विजय मिळविण्याचे भाजपचे मनसुबे धुळीला मिळाले. भाजपचे धांडे सहाव्या क्रमांकावर फेकले गेले.

धांडे यांनी बडनेरा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडे तिकीट मागितले होते परंतु ते त्यांना मिळाले नाही. धनदांडगे  धांडे नाराज होऊ नयेत म्हणून निष्ठावंतांना डावलून भाजपने त्यांना शिक्षक पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी दिली. धांडे यांनी पैशांच्या बळावर राम मेघे यांनी स्थापन केलेल्या विदर्भ वेलफेअर असोसिएशन या संस्थेचा ताबा घेऊन अध्यक्षपद पटकावले होते. या संस्थेच्या वर्धा आणि अमरावती जिल्हय़ांत शाळा आहेत. त्यामुळे शिक्षकांची मते पारडय़ात पाडून आपण विजयी होऊ असे मनसुबे धांडे यांनी आखले. परंतु त्यांचे भांडे रिकामेच राहिले.

आपली प्रतिक्रिया द्या