अमरावतीत आयपीएलवर सट्टा खेळणाऱ्यांना अटक

सामना ऑनलाईन । अमरावती

अमरावतीतील गांधी चौक परिसरात एका हुक्का पार्लरमध्ये आयपीएलवर सट्टा खेळणाऱ्या ९ जणांना अटक करण्यात आली. गुन्हे शाखेने ही कारवाई केली. पकडलेल्यांपैकी २ जण अल्पवयीन आहेत.

खबऱ्याने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा गांधी चौक परिसरातील तिरुपती टॉवर येथे हॉटस्पॉट हुक्का पार्लरवर धाड टाकून ९ जणांना अटक केली आणि १ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. मुद्देमालात १४ हजार रुपयांची रोकड, १० मोबाईल, २ एलसीडी टीव्ही आणि हुक्का पिण्याच्या साहित्याचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या