अमरावती – धाकट्या भावाच्या डोक्यात खलबत्ता घालून खून केल्याप्रकरणी मोठ्या बहिणीला अखेर अटक

980

अमरावती शहरातील खोलापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील व्यंकटेश कॉलोनीमध्ये 21 वर्षीय तरुणीने आपल्याच सख्ख्या लहान भावाची हत्त्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी मृतकाच्या बहिणीला अटक केली आहे. स्वराज तुपटकर याचा त्याच्याच सख्या बहिणीने खलबत्त्याने ठोकून खून केला होता. त्यानंतर ती फरार झाली होती.

खुनाची घटना समोर आल्यानंतर रात्री पोलिसांनी मृतकाच्या बहिणीला अटक केली. सदर तरूणीने खून केल्यानंतर इतर जणांकडे आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तिला कुणीही आश्रय दिला नाही त्यामुळे तिने स्वतःच पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे सांगण्यात येते.

काय आहे घटना?
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका दहा वर्षीय मुलाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मृतकाचे आई-वडील गुरुवारी काही कामानिमित्य बाहेर गेले होते. त्यामुळे घरात बहीण-भाऊ हे दोघेच खेळत होते. खेळता खेळता दोघांचे काही कारणावरून भांडण झाले असता 21 वर्षांच्या बहिणीने आपल्या लहान भावाच्या डोक्यात थेट खलबत्त्याने वार केला. या नंतर भाऊ हा गंभीर जखमी झाला व त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या