अमरावतीत 3 नर्स आणि 2 रेल्वे पोलिसांना कोरोनाची लागण, बाधितांचा आकडा 256 वर

610

खासगी रुग्णालयात परिचारिकेची नोकरी करणार्‍या तीन महिलांना आणि रेल्वे पोलीसमध्ये कार्यरत असलेल्या दोन जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. यासह आज आणखी 3 असे एकूण 8 नवे कोरोनाग्रस्त आढळुन आले आहे. त्यामुळे सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या 256 झाली असून त्यापैकी 147 कोरोनामुक्त झाल्याने त्यांना दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली आहे. तर हबीब नगर येथील 54 वर्षीय इसमाचा कोविड रुग्णालयात मृत्यू झाला असून मृतांची संख्या 16 झाली आहे.

बुधवारी कोरोनाग्रस्त आढळलेल्या परिचारिका रुक्मिणीनगर, बेनोडा व वडरपुर्‍यात राहणाऱ्या असून त्या एका खासगी रुग्णालयात कार्यरत आहे आहेत. त्यापैकी एक 35 वर्षीय, दुसरी 23 वर्षीय तर तिसरी परिचारिका 22 वर्षीय आहे. या तीनही परिचारिका खासगी दवाखान्यात अतिदक्षता विभागात सेवा देत होत्या. त्याच दवाखान्यात शोभा नगर येथील कोरोनाग्रस्त दाखल होता. त्याच्याच संक्रमणातून या तीनही परिचारिका कोरोनाग्रस्त झाल्या आहे.

तसेच बडनेरा येथील रेल्वेत सेवा देणारे दोन रेल्वे पोलीस कोरोनाग्रस्त झाले आहे. यापूर्वी बडनेरा येथील तीन रेल्वे पोलीस कोरोनाग्रस्त झाले होते. त्यांच्या संपर्कात आल्यामुळे हे दोघेही जण कोरोनाग्रस्त झाले. यासोबतच वडरपूरा येथे राहणारा होमगार्डचा जवान कोरोनाग्रस्त झाला आहे, तो खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात कार्यरत होता. यासोबतच अलीमनगरातील 60 वर्षी़य पुरुषाचा रिपोर्ट 25 मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्याच्याच घरातील एका महिलेचा सुद्धा मृत्यू झाला आहे त्यामुळे या कुटुंबातील सॅम्पल घेण्यात आले होते. त्यात 60 वर्षीय पुरुष कोरोनाग्रस्त झाला आहे.

मसाजगंज येथे आजपर्यंते 36 कोरोनाग्रस्त आढळुन आले होते. त्याचप्रमाणे प्रजरपुरा येथे 16 रुग्ण आढळुन आले होते. अमरावती शहरातील खोलापुरी गेट, ताजनगर, शिवनगर, रतनगंज, हबीबनगर, लालखडीसारख्या परिसर यापूर्वीच प्रतिबंधिक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्याच परिसरात कोरोनाग्रस्त अधिक सापडत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या