चक्रीवादळासोबत गुजरातच्या काही भागांत भूकंपाचे धक्के

देशावरील संकटांची मालिका थांबता थांबत नाहीय. कोरोनाच्या महामारीत भयानक तौकते चक्रीवादळ किनारपट्टीवर आदळत असतानाच सोमवारी गुजरातच्या अमरेली शहरानजीक भूकंपाचे काही झटके बसले आहेत. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाच्या धक्क्यांची रिश्टर स्केलवर तीव्रता 4.5 इतकी नोंद झाली आहे .मात्र या भूकंपाच्या धक्क्यांनी कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाहीय.अमरेलीप्रमाणेच राजकोटलाही भूकंपाचे काही झटके बसले. रिश्टर स्केलवर या धक्क्यांची तीव्रता 3.8 इतकी असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. राजकोटमध्येही या भूकंपाच्या धक्क्याने कोणतीही हानी झालेली नाही.

 

आपली प्रतिक्रिया द्या