वादात सापडलेल्या ‘इंदू सरकार’मध्ये अमृता फडणवीस यांचा रेट्रो तडका

68

सामना ऑनलाईन । मुंबई

‘फिर से’ नंतर आता अमृता फडणवीस यांचा एक नवा पैलू ‘यह पल’ या इंदू सरकारमधल्या गाण्यातून प्रेक्षकांसमोर आला आहे. ‘फिर से’ या अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या पहिल्या व्हिडिओमध्ये अमृता फडणवीस कॉलेजच्या एका मुलीच्या भूमिकेत दिसल्या होत्या. या गाण्यानंतर आता त्याहून काहीसं वेगळं गाणं घेऊन त्या प्रेक्षकांसमोर आल्या आहेत.

हे गाणं म्हणजे मधुर भंडारकर यांचा बहुचर्चित चित्रपट ‘इंदू सरकार’ या चित्रपटातील ‘यह पल’…हे गीत. आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण आपलं आयुष्य घडवत असतो. यापैकी कुठल्याही क्षणात आपण अडकून पडल्यास त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि म्हणूनच ‘यह पल में संभल, इस पल से निकल’ असं म्हणत अमृता फडणवीस हे गाणं ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोत्याला साद घालत आहेत.

अन्नु मलिक यांच्या संगीताने सजलेल्या या गाण्याचे बोल आपल्या अनोख्या संवादांसाठी ओळखले जाणारे सुप्रसिद्ध संवाद लेखक संजय छैल यांनी लिहिले आहेत. आपल्या संवादाच्या जोरावर ‘रंगीला’ चित्रपटातल्या मुन्नाला प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करून देणारे संजय छैल यांनी आपल्या लेखणीची जादू पुन्हा दाखवत ‘यह पल में संभल’ हे गाणं लिहिलं आहे. सत्तरीच्या दशकातील गाण्यांसारखी या गाण्याची रचना असून गीतकाराच्या शब्दांना अचूक न्याय देत तितक्याच ताकदीने अमृता फडणवीस यांनी हे गाणं सादर केलं आहे.

पाहा यह पल हे गीत-

आपली प्रतिक्रिया द्या