Amul कडून 6 हजाराचं गिफ्ट? जाणून घ्या काय आहे सत्य

सोशल मीडियावर काय, कसं व्हायरल होईल याचं काही सांगता येत नाही.  पण सध्या अनेक फसव्या ऑफर्सही येतात ज्यामुळे ग्राहकांचे नुकसान होते. नुकतीच अमुलच्या नावे एक ऑफरची URL सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र याबद्दलची एक महत्त्वाची आणि अत्यंत गंभीर माहिती समोर आली आहे.

एक URL अमुल कंपनीच्या नावाने फिरत आहे. या सोबत मेसेज देण्यात आला आहे की, काही प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर 6000 रुपयांचे बक्षीस मिळेल. मात्र हे स्पष्ट करू इच्छितो की ही URL आणि हा संदेश बनावट आहे. ग्राहकांना यातून फसवले जात असून यापासून सर्वांनी आपला बचाव केला पाहिजे.

ही URL खूप फॉरवर्ड होत आहे. मात्र आपण सावधान राहा. यात अमुलचा लोगो वापरण्यात आला आहे. सोबत Amul 75 Aniversary असा संदेशही लिहिण्यात आला आहे. तसेच Congratulation देखील लिहिण्यात आले आहे. खालील प्रश्नांची उत्तरे द्या आणि बक्षीस जिंका असेही यामध्ये म्हंटले गेले आहे.

एकूण चार प्रश्न आणि 9 बॉक्स आपल्याला दिसतील. प्रत्येक बॉक्सला क्लिक करण्यासाठी तीन वेळा पर्याय दिला जातो. तसेच पैसे जिंकण्यासाठी 20 फ्रेंड्स किंवा 5 ग्रुपवर हा मेसेज पाठवा असेही लिहिले आहे. मात्र असे काही करू नका हा एक बनावट मेसेज आहे.

अमुलने आपल्या ट्विटर हँडलवरून याची माहिती प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे की, ‘अशी कोणतीही ऑफर, गिफ्ट कंपनीने जाहीर केलेले नाही. हा एक स्पॅम मेसेज असून ग्राहकांनी अशा मेसेजवर विश्वास ठेवू नये. तसेच ही URL कुणाला शेअर करू नये. ‘

आपली प्रतिक्रिया द्या