अभिनेत्री अॅमी जॅक्सन आई झाली, पाहा गोंडस बाळाचा पहिला फोटो

1115

बॉलिवूड अभिनेत्री अॅमी जॅक्सन आणि तिचा प्रियकर जॉर्ज पानायिटू यांच्या घरी पाळणा हलला आहे. सोमवारी अॅमी जॅक्सन आई झाली. अभिनेत्रीने आपल्या अधिकृत इन्टाग्राम अकाऊंटवरून बाळाचा फोटो शेअर करून ही गोड बातमी दिली आहे. या गोंडस बाळाचे नाव तिने अँड्रेस (Andreas) असे ठेवले आहे.

‘सिंग इज ब्लिंग’, ‘2.0’, ‘I’ आणि अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केलेल्या अॅमी जॅक्सनने गर्भवती असल्याचे काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाद्वारे सांगितले होते. इन्टाग्रमावर तिने तिचा आणि प्रियकर जॉर्ज पानायिटूचा फोटो शेअर केला होता. ‘मला घराच्या छतावर चढून सर्वांना ओरडून ही आनंदाची गोष्ट सांगायची आहे. यासाठी मदर्स डे व्यतिरिक्त दुसरा चांगला दिवस असूच शकत नाही. माझ्या बाळाला भेटण्यासाठी आम्ही खूपच उत्सुक आहोत’ असे तिने फोटो खाली कॅप्शन लिहिले होते.

कोण आहे जॉर्ज
अॅमीचा प्रियकर जॉर्ज ब्रिटीश प्रॉपर्टी डेव्हलपर अँड्रस पानायिटूचा मुलगा आहे. त्याचबरोबर हिल्टॉन, डबल ट्री, पार्क प्लाझा यासारखी अनेक आलिशान हॉटेल्स जॉर्जच्या मालकीची आहेत. अॅबिलीटी ग्रुपचा तो संस्थापक असून वयाच्या 16 वर्षी तो या ग्रुपमध्ये सहभागी झाला होता. जॉर्जच्या वडिलांची संपत्ती ही 400 मिलिअन पाऊंड असल्याचे म्हटले जात आहे. जॉर्जकडे अनेक आलिशान आणि जगातल्या सर्वात महागड्या गाड्या देखील आहे.


View this post on Instagram

Our Angel, welcome to the world Andreas

A post shared by Amy Jackson (@iamamyjackson) on

आपली प्रतिक्रिया द्या