मिझोरामला पुन्हा भूकंपाचा धक्का; रिश्टर स्केलवर 4.1 तीव्रतेची नोंद

मिझोरामला काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. बुधवारी सकाळी पुन्हा मिझोरामला भूकंपाचा धक्का जाणवला. बुधवारी सकाळी 8 वाजून 2 मिनिटांनी मिझोरामला 4.1 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती भूकंप विक्षान केंद्राने दिली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू चम्फाई जिल्ह्यापासून 70 किलोमीटर आग्नेयेला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मिझोराममधील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपामुळे चम्फाई जिल्ह्यातील एक चर्च आणि काही घरांचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी रस्त्यांना भेगा पडल्या आहेत. याआधी मिझोरामला मंगळवारी रात्री 11 वाजून 3 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले होते. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.2 होती. सोमवारीही मिझोरामला 5.3 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. त्यात काही घरांचे आणि रस्त्यांचे नुकसान झाले आहे. या घटनेत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

आपली प्रतिक्रिया द्या