आनंदने नाकामुराला बरोबरीत रोखले

15

सेंट लुईस : पाच वेळच्या बुद्धिबळ विश्वविजेता विश्वनाथन आनंदने अमेरिकेत सुरू असलेल्या सिंकफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेत अमेरिकेच्या हिकास नाकामुराला ३० चालींतच बरोबरी स्वीकारायला लावली. ही स्पर्धेची पहिलीच फेरी होती. या झुंजीत फेबियानी करद्याना (अमेरिका) व मॅग्नस कार्लसन (नॉर्वे) यांच्यातही बरोबरी झाली.

आपली प्रतिक्रिया द्या