सतीश तारे यांच्या स्मरणार्थ ’आनंद पुरस्कार‘

दिवंगत विनोदी अभिनेते सतीश तारे यांच्या स्मरणार्थ ’आनंद’ पुरस्कार दिला जाणार आहे. आज तारे यांच्या जन्मदिनी पहिल्या ‘आनंद’ पुरस्कारांची घोषणा झाली. कल्याणी पाठारे, भाऊ कदम, श्रुजा प्रभुदेसाई, श्रीकांत भिडे, अभिजीत झुंजारराव मानकरी हे पाच रंगकर्मी पहिल्या आनंद पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

दिवंगत अभिनेता सतीश तारे म्हणजे असामान्य प्रतिभेचे कलावंत. तारे आज आपल्यात नसले तरी त्यांच्या कलाकृतींतून रसिकांना निखळ मनोरंजनाचा आनंद मिळत आहे. तारे यांच्यावर प्रेम करणाऱया मित्रांनी एकत्र येऊन त्यांच्या वाढदिवसाला म्हणजेच 22 ऑक्टोबर रोजी ’सतीश तारे आनंद पुरस्कार’ द्यायचे ठरवले आहे.

हा पुरस्कार नाटकातील कलावंत, निर्माता, दिग्दर्शक, लेखक आणि तंत्रज्ञ अशा कामातून आनंद देणाऱया पाच जणांना देण्यात येईल. त्यापैकी तीन जण व्यावसायिक रंगभूमीशी संबंधित तर दोन जण प्रायोगिक रंगभूमीशी संबंधित असतील, अशी घोषणा अभिनेते अभिनेते सुबोध भावे यांनी गुरुवारी केली. त्यानुसार व्यावसायिक विभागात ‘दादा एक गुड न्यूज आहे’ नाटकासाठी लेखिका कल्याणी पाठारे, ‘शांतेचे कार्ट चालू आहे’साठी भाऊ कदम, ‘हिमालयाची सावली’ नाटकासाठी श्रुजा प्रभुदेसाई यांना आनंद पुरस्कार जाहीर झाला. तर प्रायोगिक विभागात ध्यास- पुणे ग्रुपचे श्रीकांत भिडे आणि अभिजीत झुंजारराव मानकरी ठरेल आहेत.

सतीश तारे यांच्या मित्रमंडळींमध्ये सुबोध भावे, प्रवीण तरडे, कुणाल यज्ञोकावित, ओम भुतकर, आनंद इंगळे, सचिन देवधर, नरेंद्र भिडे, मृणाल कुलकर्णी आदींचा समावेश आहे. त्यांनीच आनंद पुरस्कारासाठी निवड समिती गठीत केलेय.

10 हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्हाऐवजी पेनड्राईव्ह, ज्यामध्ये तारे यांचा फोटो असलेली कीचेन असेल. तारे यांची मेमरी अफाट होती. त्यांच्याप्रमाणे कलाकारांची मेमरी मजबूत रहावी, ही पेनड्राईव्ह देण्यामागील संकल्पना आहे.

आपली प्रतिक्रिया द्या