पितृपक्षाबाबत काय आहेत मान्यता… गरुडपुराणात ‘असे’ आहे वर्णन…

या वर्षात 21 सप्टेंबरपासून 6 ऑक्टोबरपर्यंत पितृपक्ष आहे. पितृपक्षाबाबत अनेक मान्यता आहेत. पितृपक्षात आपले पूर्वज पृथ्वीवर उतरून आपल्याला आशीर्वाद देतात. त्यामुळे या पक्षात पूर्वजांचे स्मरण करत श्राद्धकर्म करून त्यांच्यासाठी पुरोहितांना जेवण दिले जाते. त्यानंतर कावळ्यालाही भोजन देण्याची प्रथा आहे. श्रद्धेने जे केले जाते ते श्राद्ध असे शास्त्रांमध्ये सांगितले आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या परिस्थितीप्रमाणे पितरांचे स्मरण करत त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचे प्रयत्न करतात.

काहीजणांना पितृपक्षात आपले काही पूर्वज आसपास आहेत असा भास होतो. तर काहीजणांना स्वप्नात पूर्वजांचे दर्शन होते. याबाबत गुरड पुराणात उल्लेख आहेत. योग्य विधीने पुरोहितांकडून श्राद्धकर्म करून काकग्रास म्हणजे कावळ्यांना जेवण दिल्याने पूर्वज संतुष्ट होतात, अशी मान्यता आहे. या पक्षात केलेल्या दानामुळे संतुष्ट होत पूर्वज आशीर्वाद देण्यासाठी येतात, अशा मान्यता आहे. त्यामुळे पूर्वज आसपास असल्याचा भास होणे किंवा त्यांचे स्वप्नात दर्शन होणे म्हणजेच आपण त्यांच्या स्मरणार्थ दिलेल्या दानाचा आणि अन्नाचा त्यांनी स्वीकार केला आहे, असे संकेत मिळत असल्याचा उल्लेख गरुड पुराणात आहे.

काहीजणांना पूर्वज आपल्याकडे काही मागत आहे, असे स्वप्न दिसते. तसेच काहीजणांना त्याबाबतचे संकेत मिळतात. त्यामुळे श्राद्धविधीमध्ये पूर्वजांच्या स्मरणार्थ चप्पल, छत्री, पलंग या वस्तूंसह अन्नदान करण्यात येते. मिळालेल्या संकेताप्रमाणे त्या वस्तूंचे दान केल्यास पूर्वज संतुष्ट होत आशीर्वाद देतात, अशी मान्यता आहे.

पूर्वज स्वप्नात आले आणि ते संतप्त दिसत असतील किंवा अस्वस्थ असतील तर त्यांच्या काही इच्छा अपूर्ण असल्याचे संकेत मिळत असल्याचा उल्लेख गरुड पुराणात आहे. त्यांना शांत करण्यासाठी रामायण किंवा भगवद् गीतेचे पठण केल्याने त्यांना शांती मिळत असल्याचे गरुड पुराणात म्हटले आहे.

काही जणांना पूर्वज घराजवळ किंवा आपल्या आसपास असल्याचा भास होतो. त्यावरून त्यांचा कुटुंबाबाबतचा मोह कायम असल्याचे संकेत मिळतात. असा भास होत असल्यास दररोज गायीला अन्न द्यावे आणि अमावस्येला पितरांच्या स्मरणार्थ अन्नदान करावे, असा उल्लेखही गरुड पुराणात आहे. पितृपक्षात पूर्वज आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे या काळात त्यांच्या स्मरणार्थ केलेल्या दानाने ते संतुष्ट होतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात. तसेच त्यांच्याकडून अनेक शुभसंकेत मिळत असल्याचा उल्लेखही गरुड पुराणात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या