अंडा घोटाला

साहित्य : तीन अंडी, एक पाव मटणाचा खिमा, दोन चमचे आलं-लसूण पेस्ट, पाव चमचा लवंग-दालचिनी पाकडर, दोन लहान कांदे, दोन हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, एक चमचा कसुरी मेथी, ओल्या लसणाची पात, लसणाच्या ८ ते १० लसूण पाकळ्या, दोन चमचे प्रत्येकी गरम मसाला, काळी मिरी पावडर, धना पावडर, तिखट, दोन टॉमेटो, हळद, मीठ, एक चमचा तेल.

कृती : तीनपैकी दोन अंडी उकडून, सोलून, किसून घ्या. तिसरं अंड हाफ करा. खीमा, आलं-लसूण पेस्ट, लकंग दालचिनी पावडर कुकरमध्ये वाफवून घ्या. सुटलेलं पाणी आटवताना खिमा, फ्राय करून घ्या. हिरव्या मिरच्या, लसणाची पात आणि कोथिंबीर बारीक चिरून ठेवा. कांदे आणि लसूण चिरून घ्या. टोमॅटोची प्यूरी करून घ्या. मग पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून चिरलेला लसूण परता. त्यावर खिमा घालून परता. आता चिरलेला कांदा घालून तो मऊ होईपर्यंत परता. सगळे मसाले, हळद, मीठ, कसुरी मेथी, कोथिंबीर, मिरची हे सर्व घालून परतून टोमॅटो प्यूरी घाला. त्यानंतर किसलेली अंडी त्यात मिसळा. त्यात थोडे पाणी घाला. मग हाफ प्राय केलेलं अंड त्यात मिसळा.

आपली प्रतिक्रिया द्या