चंद्रबाबू शिवसेनेच्या वाटेवर; भाजपवर जोरदार हल्ला!

8

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भाजपच्या एकूण कार्यपद्धतीवर नाराज होत आणखी एक महत्त्वाचा पक्ष एनडीएतून वेगळा होण्याची शक्यता आहे. तेलुगू देसम पक्षाने भाजपसोबत युती तोडण्याचे संकेत दिले आहेत. तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत.

‘भाजप मैत्री निभावताना दिसत नाही. आम्ही भाजपसोबत मैत्री टीकवण्याचे प्रयत्न करत आहोत. मात्र भाजपला टीडीपीसोबत युती हवी आहे, असे दिसून येत नाही. त्यामुळे तेलुगू देसम पक्षदेखील स्वबळावर निवडणुका लढण्यास सक्षम आहे’, असा इशारा मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी भाजपला दिला आहे. टीडीपी एनडीएमधील महत्त्वाचा पक्ष आहे. मात्र टीडीपीनेही २०१९च्या लोकसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू केली आहे.

काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रतील मोदी सरकार आणि राज्यातील भाजप सरकारवर शरसंधान केले होते. तसेच शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेत शिवसेना स्वबळावरच पुढल्या निवडणुका लढणार हा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मांडलेला ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे शिवसेने पाठोपाठ टीडीपीनेही स्वबळावर निवडणुका लढवण्याचे संकेत दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या