बेरोजगार ब्राह्मण तरुणांना मुख्यमंत्री देणार गाड्या

193

सामना ऑनलाईन । अमरावती

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू यांनी राज्यातील जनतेला स्मार्टफोन वाटणार असल्याची घोषणा केल्यानंतर आता ते राज्यातील काही बेरोजगार ब्राह्मण तरुणांना स्विफ्ट डिझायर गाड्या वाटणार असल्याचे समोर आले आहे. गाड्या वाटपाचा कार्यक्रम आज नायडू यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडणार आहे. या कार्यक्रमात 30 बेरोजगार ब्राह्मण तरुणांना स्विफ्ट डिझायर गाडीच्या चाव्या देण्यात येणार आहेत.

चंद्राबाबू यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या या गाड्यांच्या किमती पैकी प्रत्येकी दोन लाख रुपये ब्राह्मण वेल्फेअर कॉर्पोरेशनकडून देण्यात येणार आहे. तर दहा टक्के त्या तरुणांना भरावे लागणार असून उर्वरित रक्कम आंध्र प्रदेश सरकार ब्राह्मण क्रेडिट सोसायटीतर्फे लोनच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे.

चंद्राबाबू नायडू यांनी याआधी राज्यातील जनतेला स्मार्टफोन देणार असल्याची घोषणा केली होती. त्यासाठी 14 दशलक्ष स्मार्ट फोन नायडू सरकार खरेदी करणार असल्याचे समजते.

आपली प्रतिक्रिया द्या