विशाखापट्टणमच्या हिंदुस्थान शिपयार्डमध्ये क्रेन कोसळली, 10 जणांचा चिरडून मृत्यू

आंध्र प्रदेश येथील विशाखापट्टणम येथील हिंदुस्थान शिपयार्ड या कंपनीत क्रेन कोसळल्याने दहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत एक जण जखमी झाल्याचंही वृत्त आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, विशाखापट्ट्णम येथे हिंदुस्थान शिपयार्ड कंपनीमध्ये एका भल्या मोठ्या क्रेनचं काम सुरू होतं. त्याचवेळी ती क्रेन खाली कोसळली. क्रेनखाली चिरडल्याने दहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातात एक जण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगमोहन रेड्डी यांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत क्रेन कोसळताना दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या