आंध्र प्रदेशमध्ये कोरोना व्हायरसच्या भीतीने वृद्धाची आत्महत्या

427

कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा संशय आल्याने एका वृद्धाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे. बालकृष्णन असे त्या वृद्धाचे नाव असून गेल्या काही दिवसांपासून त्यांना खोकला ताप सर्दीचा त्रास होत होता.

चितूर जिल्ह्यातील थोट्टमबेडू गावात राहणाऱ्या बालकृष्णन यांना गेल्या आठवड्यात ताप आला. त्या तापाने ते इतके अशक्त झाले की त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. त्यांना खोकलाही झाला होता. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केल्यानंतर दोन दिवसांनी त्यांना घऱी पाठविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मास्क घालून राहण्यास सांगितले होते. मास्क घालायला सांगितल्यामुळे बालकृष्णन यांनी कोरोनाचा धसका घेतला. आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचा संशय त्यांना आला होता. त्यामुळे त्यांनी याबाबत मुलाला सांगितले. मुलाने त्यांना असे काहीही झालेले नसल्याचे समजावलेही. मात्र त्यांनी त्याचे ऐकले नाही.

आपल्याला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे आपल्यापासून दूर रहा असे ते कुटुंबातील सदस्यांना सतत बजावायाचे. शनिवारपासून त्यांनी कुटुंबीयांपासून दूर राहण्यास सुरुवात केली होती. तसेच त्यांनी खाणंपिणं देखील सोडलं होतं. अखेर सोमवारी त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली.

आपली प्रतिक्रिया द्या