एका मिनिटांत डोक्याने उघडल्या 68 सोडा बॉटल्स, गिनीज बुकात नोंद

एका मिनिटांत तब्बल 68 सोडा बॉटल्सची झाकणं डोक्याने उघडण्याचा अनोखा विक्रम आंध्रप्रदेशातील एका तरूणाने केला आहे. नेल्लोर जिल्ह्यातील प्रभाकर रेड्डी असे या तरूणाचे नाव असून त्याच्या या कामगिरीची दखल गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने देखील घेतली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसच्या

अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडियो शेअर करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे अशाप्रकारचा स्टंट करण्याचा पुणी प्रयत्न करू नये, असा सावधानतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. आपल्या इमारतीच्या गच्चीवरच प्रभाकरने हा विक्रम रचला आहे. यावेळी सुजीत कुमार आणि राकेश या त्याच्या दोन मित्रांनी त्याला सहाय्य केले. यापूर्वी हा रेकॉर्ड पाकिस्तानातील मोहम्मद रशीद नसीम नावाच्या व्यक्तीच्या नावावर होता.

आपली प्रतिक्रिया द्या