गोदावरी नदीत पर्यटकांनी भरलेली बोट बुडाली, 11 जणांचा मृत्यू

1114

आंध्रप्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्यात देवीपटनम येथे गोदावरी नदीमध्ये पर्यटकांनी भरलेली बोट बुडाली आहे. या बोटीमध्ये 61 प्रवासी होते. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या पथकाने आणि स्थानिकानी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे.अनेक जण बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे.

दरम्यान अद्यापही बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत 30 प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतरांचा शोध सुरू आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी दुर्घटनेची माहिती घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रवाशांना सर्वोतोपरी मदत करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहे. तसेच दुर्घटनेत मृत्यू पावलेलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत जाहीर केली आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पूर्व गोदावरी जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांची बोट गोदावरी नदीमध्ये बुडाली. या बोटीमध्ये 11 चालक सदस्यांसह 60 लोक प्रवास करत होते. दुर्घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. पोलीस अधिक्षक अदनान नईम असमी यांनी याबाबत पीटीआयशी बोलताना, अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जाईल असे म्हटले. तसेच प्रवाशांचा जीव वाचवण्यास प्राथमिकता असल्याचेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या