…म्हणून कर्नाटकचे वनमंत्री घाबरुन पळाले!

सामना ऑनलाईन । बेळगाव

बेळगाव येथे जैव विविधतेने नटलेल्या एका उद्यानाचे उद्घाटन सुरू असताना कर्नाटकचे वनमंत्री घाबरुन पळून गेले. कर्नाटकचे वनमंत्री रामनाथ राय हे व्हीटीयू विद्यापीठ परिसरात आले होते. मात्र तिथे घडलेल्या प्रसंगामुळे ते एकदम घाबरले आणि जीव वाचवण्यासाठी पळून गेले.

वनमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा यंत्रणेने ड्रोनद्वारे उद्घाटनस्थळी लक्ष ठेवण्याची व्यवस्था केली होती. मात्र ड्रोनच्या आवाजाने बिथरलेल्या मधमाश्या पोळं सोडून बाहेर पडल्या. मधमाश्या पाहून लोकांची पळापळ झाली आणि बिथरलेल्या मधमाश्यांनी लोकांना डंख मारायला सुरुवात केली. मधमाश्यांचा हल्ला सुरू झाल्याचे पाहून घाबरलेले वनमंत्री रामनाथ राय सुरक्षा रक्षक आणि वन कर्मचारी यांच्या गराड्यात घटनास्थळावरुन पळून गेले. थेट गाडीत बसून त्यांनी पलायन केले.

आपली प्रतिक्रिया द्या