
सोशल मीडियावर एका कुत्रा आणि मालकाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत कुत्रा फुटपाथवरच लोळत पडतो आणि त्याचा मालक त्याचे नखरे झेलून वैतागतो. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून लक्षवेधक ठरत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत एक कुत्रा फुटपाथवर लोळताना दिसत आहे. तो कुत्रा आपल्या मालकावर रागावलेला दिसत आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, कुत्रा मालकावर इतका रागावला आहे की, त्याचे नखरे पाहून मालक वैतागला आहे. कुत्र्याच्या वागण्यावरुन मालक लाजेने गोरामोरा झाला. हा व्हिडीओ प्रचंड मजेदार आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक कुत्रा फुटपाथवर लोळत होता. कुत्र्याचा मालक त्याला उठण्यासाठी बरेच प्रयत्न करत होता. मात्र तो काही अजिबात ऐकत नव्हता. मालक त्या कुत्र्याजवळ येऊन त्याला उभा करतो , मात्र तो पुन्हा तिथे लोळत बसतो.
Stop embarrassing me.. 😂 pic.twitter.com/UaEX2J88Yc
— Buitengebieden (@buitengebieden) August 13, 2022
हा व्हिडीओ ट्विटरवर Buitengebieden नावाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. एक तासापूर्वी शेअर केलेल्या व्हिडीओला 1.68 लाख वेळा पाहण्यात आला आहे. तर एका तासात या व्हिडीओला 12 हजार लोकांनी लाईक केले., त्यामुळे कुत्र्याच्या मालकाचे माहित नाही मात्र इंटरनेटवर व्हिडीओ युजर्सना प्रचंड आवडला आहे.