21 दिवसांत 5 हजार कोटी भरा, इंग्लंडमधल्या न्यायालयाचा अनिल अंबानींना आदेश

दिवाळखोरीत गेलेल्या रिलायन्स कम्युनिकेशनचे मालक अनिल अंबानी यांना 21 दिवसांत 717 अब्ज डॉलर्स (5 हजार कोटींपेक्षा अधिक) परत करण्याचे आदेश देण्यात आले आहे. इंग्लंडमधल्या एका न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. अंबानी यांच्यासाठी अधिक चिंतेची बाब ही आहे की न्यायाधीशांनी त्यांच्या आदेशात म्हटलंय की या प्रकरणात अनिल अंबानी यांनी वैयक्तिक हमी दिली असल्याने त्यांना ही रक्कम चुकवावी लागेल.

ही बातमी वाचलीत का ? – ऑफीस भाड्याने देणे आहे! अनिल अंबानींच्या RInfra मुख्यालयाचा शाळेला प्रस्ताव

न्यायालयाने अनिल अंबानी यांनी 71 कोटी 69 लाख 17 हजार 681 डॉलर्सचे कर्ज परत करावे असे आदेश दिले आहेत. अनिल अंबानी यांच्या प्रवक्त्याने सांगितले की हे प्रकरण 2012 सालचं असून हे कंपनीसाठी घेतलेल्या कर्जाचे प्रकरण आहे. यामध्ये अनिल अंबानी यांनी वैयक्तिक हमी दिली होती असं म्हटलं जात आहे, मात्र अंबानी यांच्या प्रवक्त्याने याचा इन्कार केला आहे. अंबानी यांनी अशा प्रकारच्या हमीपत्रावर सही केलेली नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. अंबानी यांच्या कंपनीने चीनच्या इंडस्ट्रिअल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायनाकडून हे कर्ज घेतलं होतं. या कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपनीविरोधात खटला दाखल केला होता.

ही बातमी वाचलीत का ? – एकेकाळी बॉलिवूडचे बादशहा पण अखेरच्या क्षणी झाले कंगाल

15 हजार कोटींच्या कर्ज परतफेडीसाठी चीनी बँकांचा तगादा
रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या कंपनीचं दिवाळं निघालं आहे. अनिल अंबानी यांची आर्थिक वाट लागलेली असतानाच चीनच्या बँकांनी त्यांच्यामागे कर्ज परतफेडीसाठी तगादा लावायला सुरुवात केली आहे. चीनच्या विविध बँकांकडून अनिल अंबानी यांच्या कंपनीने जवळपास 15 हजार कोटींचे कर्ज घेतले आहे. 11 वर्षांपूर्वी अनिल अंबानी हे जगभरातील टॉप 10 अब्जोपतींच्या यादीत सामील होते, आता त्यांच्या कंपनीची पार वाट लागली असून ती कर्जाच्या गाळात पूर्णपणे बुडाली आहे.

चीनमधील चायना डेव्हलपमेंट बँक, एक्झिम बँक, ICB यासारख्या बँकांनी अनिल अंबानी यांना भलीमोठी कर्जे दिली होती. या कर्जाच्या रकमेचा एकत्रित आकडा हा 15 हजार कोटींपर्यंत पोहोचला आहे. अनिल अंबानी यांच्याकडे आता 3,651 कोटींची संपत्ती उरली आहे. यामध्ये अंबानी यांनी गहाण ठेवलेल्या समभागांचाही समावेश आहे. हे समभाग वजा केल्यास अनिल अंबानी यांच्याकडे आता फक्त 765 कोटींची संपत्ती उरली आहे.

अनिल अंबानी यांनी रिलायन्स समूहावर 1 लाख कोटींपेक्षा जास्तीचे कर्ज आहे. यात रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स इन्फ्रा, आरकॉम आणि रिलायन्स होम फायनान्स, रिलायन्स पॉवर या कंपन्यांचा समावेश असून त्या कर्जात आकंठ बुडाल्या आहेत. यातील आरकॉमवर सर्वाधिक कर्ज असून त्याचा आकडा 47 हजार 234 कोटींपर्यंत पोहचला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या