सर्वसामान्यांच्या रेल्वे प्रवासात राजकारण नको, गृहमंत्र्यांचे आवाहन

कोरोना काळात बंद असलेली मुंबईतील रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत राज्य सरकारने प्रस्ताव दिला आहे. रेल्वे प्रशासनाने यावर राजकारण न करता सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरू करण्यास सहकार्य करावे, असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. ज्याला महानगराची ‘लाइफलाइन’ म्हणतात, ही लाइफलाइन पुन्हा सुरू करण्याबाबत महाराष्ट्र सरकारने रेल्वेला प्रस्ताव दिला आहे. यावर रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज असल्याचे देशमुख म्हणाले.

– निवडक गटात प्रवाशांची विभागणी करून सर्वसाधारण प्रवाशांना ठरावीक वेळेत रेल्वेतून प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या