वडिलांसमोर ‘असे’ कपडे घालायला लाज नाही वाटत? जेव्हा सोनम कपूर झाली होती ट्रोल

11313

अभिनेत्री सोनम कपूर सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्युनंतर नेपोटिझमवर जोरदार चर्चा झडत असून अनेक कलाकारांच्या मुलांना ट्रोल करण्यात येत आहे. त्यात सोनमचाही समावेश आहे. पण ट्रोल होण्याची ही तिची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही ती तिच्या कपड्यांवरून एकदा ट्रोल झाली होती.

सोनम कपूर ही बॉलिवूडची फॅशनिस्टा मानली जाते. अनेक हटके स्टाईल ती उत्तमप्रकारे कॅरी करते. अशाच प्रकारे एका ड्रेसचे फोटो गेल्या काही काळापूर्वी व्हायरल झाले होते. तिने एका समारंभाला तिचे वडील अभिनेता अनिल कपूरसोबत हजेरी लावली होती. त्या समारंभात तिने जो काळ्या रंगाचा पोशाख केला होता, त्याचा गळा खूप खोल होता. तिने वडिलांसोबत एक फोटोही काढला.

तो फोटो व्हायरल झाल्यानंतर सोनमवर चांगलीच टीका व्हायला लागली. तिच्या ड्रेसचा गळा खूपच खोल होता आणि तिने अनिल कपूर यांना मिठी मारत तो फोटो काढला होता. त्या फोटोवर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. वडिलांसोबत असे कपडे घालून फोटो काढणं चुकीचं असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. तसंच अशा प्रकारचे कपडे घालणं संस्कृतीच्या विरुद्ध असल्याची टीकाही त्यांनी केली होती. काही नेटकऱ्यांनी असभ्य भाषेचा वापर करत तिला वडिलांसमोर असे कपडे घालायला लाज वाटत नाही का, असा प्रश्नही विचारला होता.

आपली प्रतिक्रिया द्या