प्रशिक्षकपदाची द्रविडला ऑफर, कुंबळे ‘टीम इंडिया’चे संचालक होण्याची शक्यता

36

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. सध्या संघाचे मार्गदर्शक असलेले अनिल कुंबळे यांना संचालकपदी बढती मिळण्याची चिन्हे आहेत. कुंबळेंना बढती मिळाल्यास रिक्त झालेल्या ‘टीम इंडिया’च्या प्रशिक्षकपदी १९ वर्षांखालील आणि हिंदुस्थान ‘अ’ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे.

गतवर्षी रवी शास्त्र्ााr यांचा ‘टीम इंडिया’च्या संचालकपदाचा कार्यकाल संपल्यापासून हे पद रिक्त आहे. याचबरोबर ‘बीसीसीआय’ पुन्हा रवी शास्त्री यांना या पदावर नियुक्त करण्याच्या मूडमध्ये नाही. ‘बीसीसीआय’च्या संचालक प्रशासकीय मंडळाने नुकतीच बंगळुरूमध्ये अनिल कुंबळे यांच्याशी याबाबत चर्चा केल्याची सूत्रांची माहिती आहे. कुंबळेंनीही संचालकपद स्वीकारण्यास होकार दिल्याचे कळते. मात्र, यावेळी संचालकपदाची व्याप्ती वाढणार आहे. ‘टीम इंडिया’च्या संचालकपदाबरोबरच कुंबळे यांच्यावर हिंदुस्थान ‘अ’ आणि कुमार संघाच्या कामगिरीचा अहवाल तयार करण्याचीही जबाबदारी असणार आहे. याचबरोबर कुंबळे यांना महिला संघाकडेही लक्ष ठेवावे लागणार आहे.

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया दरम्यानची कसोटी मालिका संपल्यानंतर ‘आयपीएल’चा महासंग्राम सुरू होणार आहे. त्यामुळे हिंदुस्थानचा कुठलाही आंतरराष्ट्रीय दौरा असणार नाही. या काळात कुंबळेंना आपला अंतिम निर्णय कळविण्यास सांगण्यात आले आहे. त्यांनी जर संचालकपद स्वीकारले तर हिंदुस्थानचा माजी कर्णधार राहुल द्रविडकडे हिंदुस्थानी संघाचे प्रशिक्षकपद सोपविण्याचा ‘बीसीसीआय’चा मानस आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या