परिवहनमंत्री अनिल परब यांचा शनिवारी सत्कार

1159

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने आणि शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसैनिक ते परिवहन व संसदीय कामकाज मंत्री असा पल्ला गाठणारे  ऍड. अनिल परब यांचा प्रवास नेत्रदीपक आहे. त्यामुळे त्यांचा शिवसेना विभाग 4 आणि 5 यांच्या वतीने कृतज्ञतापूर्वक सत्कार  येत्या शनिवार,  29 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता अंधेरी पश्चिमेच्या शहाजी राजे क्रीडा संकुल येथे करण्यात येणार आहे.

या सत्कार सोहळय़ासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची खास उपस्थिती असणार आहे.  खासदार गजानन कीर्तिकर देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी गायिका वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, ऋषीकेश रानडे यांची गाण्यांची मैफल होणार आहे.तर भजनसम्राट अनुप जलोटा देखील यावेळी  उपस्थित राहतील. सोलापूरचे प्रसिद्ध नकलाकार प्रो.दीपक देशपांडे यावेळी नकला सादर करणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या