
हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष बाब ही आहे की सध्या चाचणी स्तरावर असलेली कोवॅक्सीन लस त्यांनी स्वत:ला टोचून घेतली होती. तरीही त्यांना कोरोनाची लागण झाल्याने काहीसे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
#WATCH Haryana Health Minister Anil Vij being administered a trial dose of #Covaxin, at a hospital in Ambala.
He had offered to be the first volunteer for the third phase trial of Covaxin, which started in the state today. pic.twitter.com/xKuXWLeFAB
— ANI (@ANI) November 20, 2020
विज यांनी ट्विट करत त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय की ‘मला कोरोनाची लागण झाली आहे, मी अंबाला कँट इथल्या सामान्य रुग्णालयात दाखल झालो आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आले होते त्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी’
I have been tested Corona positive. I am admitted in Civil Hospital Ambala Cantt. All those who have come in close contact to me are advised to get themselves tested for corona.
— ANIL VIJ MINISTER HARYANA (@anilvijminister) December 5, 2020
हिंदुस्थानात बनत असलेल्या कोवॅक्सीन लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. या चाचणीदरम्यान 20 नोव्हेंबरला अनिल विज यांनी ही लस स्वत:ला टोचून घेतली होती. कोवॅक्सीन लस भारत बायोटेक आणि हिंदुस्थानची वैद्यकीय संशोधन परिषद मिळून बनवत आहेत. विज यांनी या लसीच्या चाचणीसाठी लागणाऱ्या स्वयंसेवकांमध्ये आपलेही नाव असेल असे जाहीर केले होते.