सिद्धू भाजपचा रिजेक्टेड माल, भाजप नेत्याने उडवली खिल्ली

56

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नवज्योत सिंह सिद्धू हे भाजपचा रिजेक्टेड माल असल्याची टीका हरयाणा भाजपचे कॅबिनेट मंत्री अनिल विज यांनी केली आहे. सिद्धू यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर त्यांची खिल्ली उडवताना विज यांनी हे वक्तव्य केलं आहे.

पंजाबचे मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासोबत झालेल्या वादानंतर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी महिनाभरापूर्वीच काँग्रेचे तत्कालिन अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे त्यांच्या राजीनाम्याचे पत्र पाठवले होते. याविषयी पत्रकारांनी विचारले असता अनिल विज यांनी सिद्धू यांची खिल्ली उडवली ‘सिद्धू हे कोणत्याही पक्षात फिट होऊ शकत नाही. ते भाजपचा रिजेक्टेड माल आहेत. त्यामुळे ते आता राजीनामा देऊ दे नाहीतर काहीही करू देत’, असे विज यांनी पत्रकारांना सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या