राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा – अनिसा सय्यद ठरली सुवर्णपदकाची मानकरी

340

सामना ऑनलाईन । तिरूवनंतपुरम

नेमबाज अनिसा सय्यद ही राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदकाची मानकरी ठरली आहे. केरळमधील तिरूवनंतपुरम येथे पार पडलेल्या ६१ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत अनिसाने ३३ गुणांची कमाई केली आहे. अनिसा सय्यदने २५ मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली असून तिच्या पाठोपाठ महाराष्ट्राची महिला नेमबाज शितल थोरात ३० गुणांची कमाई करत दुसऱ्या, तर राही सरनौबत २८ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. या नेमबाजी स्पर्धेत शितलला रौप्यपदक तर राहीला कांस्यपदक मिळाले आहे.

या व्यतीरिक्त भाकर या खेळाडूनेही सुवर्णपदकाची कमाई केली असून हे त्याचे ११वे सुवर्णपदक आहे. महिला लहानगटात हरियाणाची नेमबाजपटू चिंकी यादवलाही सुवर्णपदक मिळाले तिने ३१ गुणांची कमाई केली आहे. तर हरियाणाच्या गौरी शेरॉनला रौप्यपदक व महाराष्ट्राच्या साई गोडबोलेला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ११ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत तब्बल ५०० पेक्षा जास्त नेमबाज खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

आपली प्रतिक्रिया द्या