दमानियांचा दम, लाडक्या बहिणीविरुद्ध कोर्टात जाणार

लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मिंधे सरकारने सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेविरुद्ध ‘आम आदमी’ पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया यांनी कोर्टात जाण्याची तयारी केली आहे. ‘लाडकी बहीण’चा प्रचार करताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वत:ची जाहिरातबाजी करीत असतील, तर त्यावर आमचा आक्षेप आहे. याविरोधात जनहित याचिका दाखल करणार आहे, असा थेट दम अंजली दमानिया यांनी मिंधे सरकारला दिला.