अंजनवेल येथे मच्छिमार नौकेला जलसमाधी, खलाशी सुखरूप परतले

463

रत्नागिरी येथे मासेमारीसाठी गेलेली एक मच्छिमार नौका खोल समुद्रात बुडाली. नौकेवर आठ खलाशी होते. सहा जणांनी पोहत किनारा गाठला तर उर्वरित दोन खलाशांना दुसऱ्या एका नौकेने वाचवले आहे. ही दुर्घटना गुहागर तालुक्यात अंजनवेल लाईट हाऊस समोरील खोल समुद्रात घडली.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून नौकेला मात्र जलसमाधी मिळाली आहे. समुद्र खवळलेला असल्याने आज नौका बुडाली.नौका बुडत असल्याचे समजताच सहा खलाशांनी समुद्रात उड्या टाकून पोहत जीव वाचवला. दोन खलाशी नौकेचा आधार घेऊन मदतीची याचना करत असताना जवळ असलेल्या दुसऱ्या नौकेने त्या दोन खलाशांना वाचवले. ही नौका रविवारी सकाळी मच्छिमारीसाठी गेली होती.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या