अंजुमन इस्लाम कॅटरिंग कॉलेजचा मग्न फेस्टिव्हल

52

अंजुमन इस्लाम इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग कॉलेजचा ‘मग्न2के16’ हा वार्षिक आंतर महाविद्यालयीन युथ फेस्टिव्हल चौदा आणि पंधरा डिसेंबरला होणार आहे. नवरस ही थीम आणि आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आणि फूड फेस्टिव्हल असे या महोत्सवाचे स्वरूप असणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये मुंबईतील सुमारे पन्नास कॉलेजमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

मग्नमध्ये डान्स, गायन, फोटोग्राफी, कबड्डी, बॉक्स क्रिकेट, रिंग फुटबॉल, कॅरम, काऊंटर स्ट्राईक अशा विविध स्पर्धा होणार आहेत. यंदाच्या या फेस्टिव्हलला सेलिब्रेटी शेफ विकी रत्नानी, गौतम मिराशी हजेरी लावणार असून वॉईस ऑफ इंडिया फेम मल्हार कर्माकरदेखील उपस्थित राहणार आहे, अशी माहिती कॉलेजच्या प्राचार्या रूक्साना बिलीमोरीया यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या