Delhi Violence- अंकीत शर्मांना 400 हून अधिक वेळा भोसकले, पोस्टमॉर्टेममध्ये झाला खुलासा

4072

CAA चा विरोध करणारे आणि समर्थन करणारे यांच्या Delhi Violence दिल्लीमध्ये हिंसक झडप झाली. या झडपेनंतर हिंसाचाराचा आगडोंब उसळला असून यामध्ये आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसक जमावाने ज्यांना ठार मारलं त्यामध्ये IB officer गुप्तचर विभागाचे अधिकारी  Ankit Sharma अंकीत शर्मा यांचाही समावेश होता. शर्मा यांच्या पोस्टमॉर्टेमचा अहवाल प्राप्त झाला असून यामध्ये त्यांना अगणित वेळा भोसकल्याचं कळालं आहे. त्यांच्या छातीवर आणि पोटात चाकूने अनेकदा भोसकल्याचं या अहवालामुळे कळालं आहे.

अंकीत शर्मा यांच्या पॉस्टमॉर्टेम रिपोर्टमुळे धक्कादायक गोष्टींचा उलगडा झाला आहे. त्यांच्या शरीरावर असंख्य जखमा होत्या आणि या जखमा भोसकल्याने झाल्याचं निष्पन्न झालं आहे. छातीवर आणि पोटावर ज्या पद्धतीने वार करण्यात आले आहेत ते पाहता अंकीत शर्मा यांचा मृत्यू हा अत्यंत वेदनादायी पद्धतीने झाला असावा हे सहजपणे कळतं आहे. अहवालानुसार अंकीत शर्मा यांना 4 ते 6 तास भोसकण्यात आले होते अशीही बाब या पोस्टमॉर्टेमद्वारे उघड झाली आहे. इतक्या क्रूर पद्धतीने मारल्याचे आपण आजपर्यंत कधीही बघितले नव्हते असं पोस्टमॉर्टेम करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटले आहे. याबाबतचे वृत्त ऑप इंडिया नावाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

अंकीत शर्मा यांच्या वडीलांना मुलाच्या हत्येबाबत पोलिसांत तक्रार दिली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. गुन्हा ज्यांच्याविरूद्ध दाखल करण्यात आला आहे त्यांच्यामध्ये आपमधून निलंबित करण्यात आलेल्या नगरसेवक ताहीर हुसैन याचेही नाव आहे. त्याच्यावर आरोप आहे की त्याने गुंड जमवले आणि कार्यालयाच्या गच्चीवरून गोळीबार केला, पेट्रोलबॉम्ब फेकले. संध्याकाळी पाचच्या सुमारास घरातून सामान आणण्यासाठी बाहेर पडलेल्या अंकीत यांचा खून केल्यानंतर त्यांना गटारामध्ये फेकून देण्यात आलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या