अंकिताच्या परिवारात दोन नवे पाहुणे, शेअर केली एक खास पोस्ट

8716
ankita-lokhande

अभिनेत्री अंकिता लोखंडेचा बॉयफ्रेंड विकी जैन याच्या बहिणीने जुळ्यांना जन्म दिला आहे. यामुळे अंकिता अत्यंत खूष असून तिने कुटुंबातील दोन नव्या पाहुण्यांचे आनंदात स्वागत केले आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अंकिता बराच काळ दुःखात होती. मात्र दोन नव्या इवल्याश्या पाहुण्यांनी तिच्या जीवनात पुन्हा एकदा आनंदाचे क्षण आणले आहेत.

अंकिताने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटो मध्ये तिच्या हातात वर्षा जैन यांची जुळी मुलं अबीर आणि अबीरा अशी या दोघांची नावे आहेत. या पोस्ट मध्ये अंकिता म्हणते की, ‘ आमच्या परिवारात आज आनंदी आनंद आहे, नव्या जीवनाची सुरुवात आहे कारण दोन नव्या पाहुण्यांचे आमच्या घरात आगमन झालं आहे. अबीर आणि अबीराचे स्वागत. वर्षा आणि जिजू अभिनंदन!’

आधीचा बॉयफ्रेंड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूमुळे अंकिता लोखंडे गेले काही दिवस दु:खात होती. मात्र आता तिच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे क्षण आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या