‘मणिकर्णिका’मधून अंकिता करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण

ankita-lokhande

सामना प्रतिनिधी । मुंबई

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे आता आपल्या बॉलीवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. आगामी ‘मणिकर्णिका’ या चित्रपटातून ती रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कंगना रनौतसोबत ती स्क्रीन शेयर करताना दिसणार आहे.

पवित्र रिश्ता मालिका बंद झाल्यापासून अंकिताच्या बॉलीवूड पदार्पणाची चर्चा होती. काही दिवसांपूर्वीच ती संजय दत्तच्या मलंगमधून डेब्यू करणार असल्याची चर्चा होती. अखेर मणिकर्णिकाच्या निमित्ताने अंकिता आता नवी इनिंग सुरू करणार आहे. या चित्रपटातून पदार्पण करत असल्याच्या वृत्तालाही तिने दुजोरा दिला असून आपल्या नव्या इनिंगबाबत आपण खूप उत्सुक असल्याची प्रतिक्रीया तिने दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या