सुपरस्टार अंकुश चौधरी 15 वर्षांनंतर छोटय़ा पडद्यावर!

सुपरस्टार अंकुश चौधरी तब्बल 15 वर्षांनंतर टेलिव्हिजनवर दमदार एण्ट्री घेण्यासाठी सज्ज झाला आहे. स्टार प्रवाहवर 21 ऑगस्टपासून सुरू होणाऱया ‘मी होणार सुपरस्टार’ या डान्स रिअलिटी शोमध्ये अंकुश सुपर जजची जबाबदारी पार पाडणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातलं टॅलेण्ट या डान्सच्या मंचावर अवतरणार आहे. त्यामुळे सुपरस्टार होण्याचं कुणाचं स्वप्न पूर्ण होणार याची उत्सुकता नक्कीच असेल.

 नृत्याचे वेगवेगळे प्रकार तितक्याच हटके पद्धतीने ‘मी होणार सुपस्टार’च्या मंचावर सादर होणार आहेत. त्यामुळे स्पर्धा अटीतटीची आहे. या स्पर्धकांमधून सुपरस्टार निवडण्याची जबाबदारी अंकुशच्या खांद्यावर आहे. याविषयी अंकुश म्हणाला, ‘‘पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजनकडे वळताना अतिशय आनंद होत आहे. जजची भूमिकाही पहिल्यांदाच पार पाडतोय. डान्स हा माझ्या अतिशय आवडीचा विषय आहे. या शोमध्ये जरी मी जज असलो तरी मी टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिनिधीची जबाबदारी पार पाडणार आहे. फरक एवढाच असेल की प्रेक्षक या कार्यक्रमाचा आनंद घरबसल्या घेतील आणि मी प्रत्यक्ष घेईन. मी या शोसाठी प्रचंड उत्सुक आहे.’’

आपली प्रतिक्रिया द्या