अण्णा भडकले! संघाशी नातं जोडून बदनामी करणाऱयांना कोर्टात खेचणार

44

सामना ऑनलाईन, नगर

ज्येष्ठ समाजसेकक अण्णा हजारे यांनी नकी दिल्लीत रामलीला मैदानाकर नुकतेच लोकपाल आणि शेतकऱयांच्या प्रश्नावर आंदोलन केले होते. ‘या आंदोलनाचा संघाशी काहीही संबंध नाही. हा संबंध जोडून आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत’, असे स्पष्टीकरण अण्णा हजारे यांनी दिले आहे. अशा प्रकारे बदनामी करणाऱया लोकांविरुद्ध लवकरच उच्च न्यायालयामध्ये बदनामीचा खटला दाखल करण्याचा निर्णय अण्णांनी घेतला आहे.

या आंदोलनातील कार्यकर्त्या कल्पना इनामदार या नथुराम गोडसेंच्या नात असून त्यांच्याकडे आंदोलनाचे नेतृत्व होते असे वृत्त काही वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले होते. हे धादांत खोटे वृत्त असल्याचे अण्णांनी प्रसिद्धीपत्रक काढून स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या